4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन
रायबरेलीमधील (Raebareli) सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) मोठं आश्वासन दिलं आहे. 4 जूननंतर शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल असे राहुल गांधी यांनी सांगितले.
Rahul Gandhi : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अद्याप मतदानाचा तीन टप्पे बाकी आहेत. या काळात सर्वच राजकीय नेते प्रचारात मोठं मोठी आश्वासने देत आहेत. दरम्यान, रायबरेलीमधील (Raebareli) सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) मोठं आश्वासन दिलं आहे. 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल असे राहुल गांधी यांनी सांगितले. आमचं इंडिया आघाडीचं सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देईल असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
मनरेगासाठी 250 रुपये नाही तर 400 रुपये मिळतील
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन राहुल गांधी यानी दिलं आहे. तसेच आम्ही पुन्हा मनरेगा व्यवस्थित सुरू करु. तुम्हाला मनरेगासाठी 250 रुपये नाही तर 400 रुपये मिळतील असेही राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जे माफ केलेली नाहीत, आम्ही अमेठीतील सर्व गरीब शेतकऱ्यांची कर्जे माफ करुन दाखवू असेही गांधी म्हणाले. मी अमेठीचा होतो, मी अमेठीचा आहे आणि राहणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये शेतमालाला योग्य दर मिळत नाही
उत्तर प्रदेशमध्ये शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तांदळाला, ऊसाला, बटाट्याला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाची योग्य किंमत होत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळं 4 जूननंतर सर्व शेतकऱ्यांना कायदेशीर किमान आधारभूत किंमत मिळेल.
जे रायबरेलीसाठी होईल तेच अमेठीमध्येही होईल
रायबरेलीसारखाच विकास अमेठीमध्ये देखीली होईल. जे तिथं होईल ते अमेठीत देखील होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मी रायबरेलीचा खासदार होणार आणि अमेठीचाही खासदार होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 10 रुपये रायबरेलीला विकासासाठी जातील, तर 10 रुपये अमेठीत विकासासाठी येतील असेही गांधी म्हणाले. रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा, पूल जे काही रायबरेलीत येईल ते सर्व अमेठीत देखील येईल असे गांधी म्हणाले.
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या: