T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तानसह 'या' पाच सामन्यांनी चाहत्यांची धाकधुक वाढवली, पाहा हायवोल्टेज सामन्यांची यादी
T20WC 2022 : टी20 विश्वचषक 2022 आता अंतिम टप्प्यात पोहचत असून न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला असून इतर तीन जागांसाठी चुरस दिसून येत आहे.
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) आता बघता बघता अंतिम टप्प्यात आला असून केवळ 4 सामन्यानंतर सेमीफायनल (Semifinal) सामन्यांना सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत देखील पोहोचला असून इतर तीन स्थानांसाठी काही संघात चुरस आहे. दरम्यान विश्वचषकाचे अगदी पात्रता फेरीपासूनचे सामने अगदी रंगतदार होत आहेत. सुपर-12 फेरीचे सामनेही कमालीचे चुरशीचे होत असून आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतील पाच सर्वात हायवोल्टेज सामने कोणते त्यावर नजर फिरवूया...
भारत विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला विजयासाठी 160 धावा करायच्या होत्या, मात्र 31 धावांवर 4 विकेट गमावल्याने टीम इंडियाचा संघर्ष सुरू होता. त्याचवेळी विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने शानदार भागिदारी केली. ज्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना भारताच्याबाजूने झुकला. सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावा केल्या.
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाव्बे
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या 131 धावांची गरज होती, परंतु पाकिस्तानचा संघ केवळ 129 धावा करू शकला.
झिम्बाव्बे विरुद्ध बांगलादेश
झिम्बाब्वे-बांगलादेश सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत नाट्य रंगलं. या सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेचा 3 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर अंपायरने दोन्ही संघांना पुन्हा बोलावलं, होतं कारण शेवटचा चेंडू नो बॉल होता. झिम्बाब्वेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावा करायच्या होत्या, पण झिम्बाब्वेचे फलंदाज 4 धावा करू शकले नाहीत आणि बांगलादेशचा विजय झाला.
भारत विरुद्ध बांगलादेश
भारतीय संघाचे सगळेच सामने रंगतदार झाले आहेत. त्यात 2 नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश संघ आमनेसामने असताना भारताने रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशला शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती, मात्र बांगलादेशी फलंदाज अर्शदिप सिंहच्या चेंडूवर षटकार ठोकू शकले नाहीत आणि टीम इंडियाने सामना 5 धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
आज अर्थात 4 नोव्हंबर रोजी पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानचा संघ पराभूत झाला पण त्यांच्या एकहाती झुंजीने सर्वांचीच मनं जिंकली. खासकरुन राशीद खाननं 23 चेंडूत नाबाद 48 रन केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने दिलेलं 169 धावाचं आव्हान पार करतान अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 164 धावाच करु शकला.
हे देखील वाचा-