तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे. आता इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हवाईतळावर हल्ला केला आहे. अमेरिकी सैन्यावर जवळपास डझनहून अधिक मिसाईल यावेळी डागण्यात आले आहेत. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अबरिल, अल असद आणि ताजी सैन्य या तळांवर हल्ला इराणने चढवला आहे.  इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अमेरिकेच्या सैनिकांनी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.


इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे किती सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला चढवण्यात आल्याचं इराणच्या न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प देशाला संबोधित करणार आहेत. अमेरिकेच सुरक्षा दलाच्या उच्चस्थरित बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यामुळे अमेरिका आता काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.




अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्यासह अनेक सैनिकही मारले गेले होते. हल्ल्यात सुलेमानी यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख पटवणं कठीण होतं. मात्र सुलेमानी यांच्या अंगठीमुळे त्यांची ओळख पटली. मात्र सुलेमानी यांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखीच वाढला आहे.

अमेरिकेने जारी केलेल्या पत्रकानुसार, अनेक अमेरिकी नागरिकांच्या हत्येचा आरोप सुलेमानीवर होता. इराणमधील अमेरिकेच्या दुतावासावर हल्ल्या केल्याचाही आरोप सुलेमानीवर होता. ट्रम्प यांचे कट्टर विरोधक आणि अमेरिकेला कायम धमक्या देण्याचं काम सुलेमानी यांनी केलं. सेना प्रमुख असल्याने सुलेमानींकडेच इराणच्या कुड्स सेनाचे नेतृत्व होतं. 2019 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेनं इराण रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुर्द सेनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतरही त्यांच्या कारवाया सुरुच होत्या. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सुलेमानी यांना इशारा दिला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेनं ड्रोन हल्ला केला.


संबंधित बातम्या




WEB Explainer | मोदी सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करतंय का? | एबीपी माझा