ज्या संस्थेनं हे बक्षिस जाहीर केलं आहे, त्यांनी इराणच्या प्रत्येक नागरिकाने यासाठी एक डॉलर रुपये द्यावे, असं आवाहन केलं आहे. अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. इराणमधील 52 ठिकाणं टारगेट केली असून जर इराणने कासिम सुलेमानी याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर या क्षणात ही ठिकाण लक्ष्य केली जातील, असा इशारा डॉनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांचा ट्विटद्वारे इशारा -
डॉनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करुन इराणला इशारा दिला आहे, त्यात ते म्हणतात, "याला एक इशारा समजा, इराणने अमेरिकी नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला केला, तर, लक्षात ठेवा आम्ही इराणमधील 52 ठिकाणांना लक्ष्य करुन ठेवलं आहे, ज्यात काही अतिमहत्वाची तर, काही इराणची सांस्कृतिक ठिकाणं आहेत. ही ठिकाणं काही क्षणात लक्ष्य केली जातील".
अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला -
अमेरिका आणि इराण यांच्यात दिवसेंदिवस तणाव निर्माण होताना दिसत आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बगदादमधील अमेरिकी दुतावास आणि सैन्य ठिकाणांवर शनिवारी (4 जानेवारी)रात्री दोन क्षेपणास्त्राने हल्ला झाला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून बदला घेणार असल्याचं बोललं गेलं होतं. अजूनही या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची थिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानीचा मृत्यू -
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. या रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला आहे.
संबंधित बातम्या -
इराणकडून बदला? अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला
अमेरिकेचा पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला, सहा जणांचा मृत्यू
इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; 8 जणांचा मृत्यू
Modi meets Donald Trump | नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, इराण, व्यापार, फाईव्ह जीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा | ABP Majha