News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

Shakuntala Devi Trailer : 'ह्युमन कॉम्पुटर' शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या बालन, मजेशीर ट्रेलर रिलीज

सिनेमात सान्या मल्होत्रा, अमित साध मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'शकुंतला देवी' सिनेमा थिएटरमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल.

FOLLOW US: 
Share:

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट 'शकुंतला देवी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात विद्या बालन मॅथेमॅटिशियन (गणित तज्ज्ञ) शकुंतल देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसलेला विद्या बालनचा लूक तिच्या मागील चित्रपटांपेक्षा एकदम वेगळा आहे. सिनेमात 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा, अमित साध मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'ह्युमन कॉम्युटर' नावाने प्रसिद्ध गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्टर शकुंतला देवी यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांनी आयुष्यात मिळवलेलं यश हा प्रवास सिनेमात उलगडला जाणार आहे.

सान्या मल्होत्रा सिनेमात विद्या बालनच्या मुलीची भूमिका साकारत आहे. तर अमित साध सान्याचा लव्ह इंटरेस्ट म्हणून दिसणार आहे. शकुंतला देवी यांचा यशाचा प्रवास सरळ नाही तर खडतर होता, हे सिनेमाच्या ट्रेलरमधूनही दिसत आहे. त्यासाठी त्यांनी काय-काय केलं हे सिनेमात दाखवलं जाणार आहे. गणिततज्ज्ञ नंतर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नंतर ह्युमन कॉम्युटर या महत्त्वाच्या टप्प्यांचा मजेशीर प्रवास आणि त्यात असलेले इतर अडथळे या सिनेमात उलगडणार आहेत.

विद्या बालनने आपल्या भूमिकेबाबत सांगितलं की, मोठ्या पडद्यावर ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवी यांनी भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला. शकुंतला देवी या सशक्त स्त्रीवादाचा आवाज होत्या. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

शकुंतला देवी सिनेमा थिएटरमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल. सिनेमाचा डिजिटल प्रीमियर 31 जुलैला असणार आहे. सिनेमाची कथा अनू मेनन आणि नयनिका महतानी यांनी लिहिली आहे. तर डायलॉग इथिता मोइत्रा यांनी लिहिले आहेत.

Published at : 15 Jul 2020 05:39 PM (IST) Tags: Shakuntla Devi Shakuntla devi Trailer amazon prime Vidya Balan

आणखी महत्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2025 | बुधवार

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2025 | बुधवार

KL Rahul Century Celebration : खणखणीत शतक ठोकल्यावर केएल राहुलचं अनोखं सेलीब्रेशन, राजकोटमध्ये घडलं काहीतरी वेगळच, सगळेच थक्क, पाहा Video

KL Rahul Century Celebration : खणखणीत शतक ठोकल्यावर केएल राहुलचं अनोखं सेलीब्रेशन, राजकोटमध्ये घडलं काहीतरी वेगळच, सगळेच थक्क, पाहा Video

धक्कदायक! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, कोल्हापुरात शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना

धक्कदायक! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, कोल्हापुरात शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना

KL Rahul Century : रोहित-कोहलीची लवकर एक्झिट, पण संकटमोचक KL राहुलचं शतक अन् चित्र पालटलं, न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान

KL Rahul Century : रोहित-कोहलीची लवकर एक्झिट, पण संकटमोचक KL राहुलचं शतक अन् चित्र पालटलं, न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान

राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला दौंडमध्ये कोयत्यानं मारहाण, घटना CCTV मध्ये कैद, अद्याप पोलिसांकडून कारवाई नाही

राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला दौंडमध्ये कोयत्यानं मारहाण, घटना CCTV मध्ये कैद, अद्याप पोलिसांकडून कारवाई नाही

टॉप न्यूज़

धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'

BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'

'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली,  बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला

ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला