Ravindra Jadeja injured : अष्टपैलू जडेजाला विश्वचषकालाही मुकावं लागणार?
टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला मुकावं लागण्याची शक्यता आहे. जाडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळं त्याला युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे. जाडेजाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचं समजतं. या शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान सहा महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात येऊ शकतो. दरम्यान, जाडेजाच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. येत्या १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. ((ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषक असो किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतीय संघात रवींद्र जाडेजाचा समावेश असणं का महत्त्वाचं आहे, ते जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून.))