T20 WC 2021 : महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत, पाहा काय म्हणतायत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत पुन्हा एकदा टीम इंडियात सामील झाला आहे. यूएईत सुरु झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी धोनीची टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटरसिकांकडून सोशल मीडियावर त्याचा उल्लेख मेन्टॉरसिंग धोनी असा करण्यात येत आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाचा सराव दुबईत सुरु आहे. धोनीनं काल पहिल्यांदा मेन्टॉरच्या भूमिकेत टीम इंडियाच्या सरावाला हजेरी लावली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सीनियर कोचिंग स्टाफशी त्यानं चर्चाही केली. धोनीनं 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेटमधून, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यानं पहिल्यांदाच बीसीसीआयनं त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.