IPL 2021 : आयपीएलमधील उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवणार : बीसीसीआय

Continues below advertisement

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या मोसमावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर सरले आहेत. कारण आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संसर्गा मुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

मागील अनेक दिवसांपासून आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात येतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु बीसीसीआयने याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नव्हतं. परंतु आज (29 मे) आयपीएल 2021 बाबत बीसीसीआयने एक बैठक बोलावली. त्यात आयपीएलमधील उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी यूएईची निवड करण्यात आली.

आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून झाली होती. सुमारे 25 दिवस ही स्पर्ध यशस्वीरित्या आयोजित करण्यात बीसीसीआयला यश आलं. परंतु संघ अहमदाबाद आणि दिल्ली पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्ध तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram