Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, राहुल गांधींवर कारवाई करण्याची मोदींची मागणी, कालच्या संसदेतल्या भाषणावरुन मोदींचा पलटवार

 उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात

ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात गुफ्तगू, विधानपरिषदेच्या लॉबीत दोघांमध्ये चर्चा, नार्वेकरांनी शेलारांचीही घेतली गळाभेट

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याचं निलंबन, सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित, विरोधकांचा गदारोळ 

अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी  मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर आज विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट...लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या आमदार आणि जिल्हापमुखांची बैठक, मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात बैठक सुरू

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram