Vidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय...या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं...महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे...त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...पाहुया एक स्पेशल रिपोर्ट...
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय...
निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झालीय...
भाजपकडून -
१. पंकजा मुंडे
२. योगेश टिळेकर
३.डॉ. परिणय फुके
४. सदाभाऊ खोत
५. अमित गोरखे
यांना उमेदवारी देण्यात आलीय...
शिंदेंच्या शिवसेनेकडून
१. भावना गवळी
२. कृपाल तुमाणे
तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून
१. राजेश विटेकर
२. शिवाजीराव गर्जे
असे महायुतीकडून ९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत...
महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातवांना तिकीट देण्यात आलंय...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जंयत पाटलांना पाठिंबा दिलाय...
तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय..