Virat Kohli Steps Down as Test Captain : विराट कोहलीचा भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा
Virat Kohli Steps Down as Test Captain : टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री आणि धोनी यांचे आभार व्यक्त केले आहेत. विराटच्या पत्रात धोनी आणि रवी शास्त्री यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसेच बीसीसीआय आणि चाहत्यांचेही विराट कोहलीने आभार व्यक्त केले आहेत.
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
