एक्स्प्लोर
Sunandan Lele and Gaurav Joshi on IND vs PAK : टीम इंडिया भारी की पाक? प्रेक्षकांचा उत्साह शिगेला
ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या प्रत्येक घडामोडीवर एबीपी माझाची सूक्ष्म नजर असणार आहे. आणि त्यासाठी एबीपी माझाचे दोन प्रतिनिधी ऑस्ट्रेलियात सज्ज झाले आहेत. त्यापैकी एक आहेत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आणि दुसरे आहेत मूळचे ठाण्याचे, पण ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत स्थायिक झालेले क्रिकेट समीक्षक गौरव जोशी. पाहूयात भारत आणि पाकिस्तानमधल्या सलामीच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुनंदन आणि गौरव यांच्यामधली जुगलबंदी कशी रंगलीय?
आणखी पाहा























