सातारा : फक्त एकजण तयार व्हा, फलटणचं वैभव बदलतो, उदयनराजेंचा निंबाळकरांवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा रामराजे निंबाळकरांवर निशाणा साधला आहे. फलटणच्या दौऱ्यावर असताना आपल्या समर्थकांशी ते बोलत होते. रामराजेंना कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, त्यांना असणाऱ्या प्रत्येक आक्षेपांची उत्तरं देईल.. असं आव्हान उदयनराजेंनी निंबाळकरांना दिलं आहे. रामराजेंसारख्या लोकांमुळेच इतरांचं फावतं, असं म्हणत कुठं मालोजीराजे आणि कुठं रामराजे निंबाळकर असंही उदयनराजे म्हणाले..
फलटणचं वैभव बदलायचं असेल तर तुमच्यातला फक्त एका जणानं तयार व्हा, असं आवाहनही त्यांनी आपल्या समर्थकांना केलं.
फलटणचं वैभव बदलायचं असेल तर तुमच्यातला फक्त एका जणानं तयार व्हा, असं आवाहनही त्यांनी आपल्या समर्थकांना केलं.