PM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच या कार्यक्रमाकडं पाठ फिरवली. सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे ११ आमदार असूनही एकच आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले... त्यामुळे मोठी चर्चा रंगलीय... पाहूयात नेमकं काय घडलंय...
प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्घाटन करण्याचा कार्यक्रम पुण्यातल्या बेभान पावसामुळे वाहून गेल्यानंतर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातल्या मेट्रोचं आणि सोलापुरच्या विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन झालं... सोलापुरातल्या विमानतळावरच या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं...
त्यासाठी सोलापुरातल्या सगळ्या आमदार-खासदारांना
निमंत्रणही धाडलं, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमाला बहुतांश आमदार आणि खासदारांनी चक्क दांडी मारल्याचं बघायला मिळालं...
यामध्ये 9 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद आमदार आणि 2 खासदारांचा समावेश होता... यातील दोन खासदार महाविकास आघाडीचे तर इतर 10 जण महायुतीचे होते...
त्यामुळे आता या कार्यक्रमापेक्षा दांडी बहाद्दर आमदार खासदारांचीच जिल्ह्यात चर्चाय...
तर दांडी मारणाऱ्या लिस्टमध्ये नेमकं कोणकोण होतं पाहूयात...