Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेच्या निवडणुका ज्या वेगाने जवळ येतायत... त्या वेगाने बैठकांचा जोरही वाढू लागलाय... महायुतीनेही रात्री उशिरापर्यंत खलबतं करत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेयत... त्यात जागावाटप आणि उमेदवार ठरवणे यासोबतच महायुतीतील नेत्यांसाठी काही नियम आखण्यावर चर्चा झालीय... एकूणच, लोकसभेला बसलेल्या चटक्यानंतर महायुतीकडून ताकही फुंकून पिण्याचं धोरण आखलं जातंय... पाहूयात, महायुतीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं... या स्पेशल रिपोर्टमधून...
विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर
येऊल ठेपल्यात... ज्या वेगाने निवडणुका जवळ
येतायत, त्याच वेगाने बैठकांचा जोरही वाढू
लागलाय... आणि जागावाटपावरून जोरदार
खलबतं होऊ लागलीय... रात्री उशिरापर्यंत
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा
निवासस्थानी बैठक पार पडली... त्यात स्टँडिंग
सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या
जागांवर मोठा खल झाला...