Akshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report
एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं अखेर सात दिवसांनी दफन करण्यात आलंय. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आला.. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली आणि कळवा इथे अक्षयचा अंत्यविधी करण्यास विरोध झाल्यानंतर उल्हासनगरमधील स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आला... मात्र यावेळीही विरोध झाला... दफनविधीसाठी खोदलेला खड्डा स्थानिकांनी बुजवला... यावेळी मोठा संघर्ष झाला... पाहूयात...
दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम
अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर प्रचंड विरोधानंतरही
दफन करण्यात आला... मात्र, त्याच्या
एन्काऊंटरवरून उलटसुलट चर्चा रंगलेल्या
असताना, त्यात जितेंद्र आव्हाडांनी ऑडिओ
क्लिपच्या माध्यमातून नवा ट्विस्ट आणलाय...
सुरेश काटेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, उल्हासनगर