पुणे : संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा मनू श्रेष्ठ, संभाजी भिडेंचं आणखी एक वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2018 10:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढे होता, असं वक्तव्य करुन श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहेत...
गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन, आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू, हा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता. असं विधान भिडे यांनी केल्याचा व्हीडिओ सध्या फिरत आहे. वारीला जाण्यासाठी संभाजी भिडे आणि त्याचे शेकडो धारकरी संचेती रुग्णालयाजवळ जमले होते. यावेळी बोलताना भिडे यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे. आता या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.