ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मराठा आरक्षणाबाबत ५४ लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, आणखी काय पुरावे हवेत, जरांगेंचा सवाल

देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय... सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत.......

मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो, भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर..  शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसोबत रात्री  खलबतं... 

मविआच्या बैठकीत विदर्भातल्या बहुतांश जागांवर चर्चा, आव्हाडांची माहिती..पितृपक्षानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता... उद्या पुन्हा बैठक...

१ ऑक्टोबरपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.. पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, बंटी पाटील, अमित देशमुखांसह इतर नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी

सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा

नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकानं लुटले लाडकी बहिणींचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती..केंद्र संचालक सचिन थोरात फरार...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram