Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले होते तसेच, जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना शांतता मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
अविमुक्तेश्वर महाराजांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती, विश्वासघातकी आणि देशद्रोही म्हणत शिंदेंच्या बंडावर त्यांनी भाष्य केलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिंदेंचं कौतूक केलंय.
राज्य सरकारने देशी गाईंना राज्यमाताचा दर्जा दिल्यानंतर हिंदू धर्मगुरुंकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. जो गो माता, हिंदू धर्म, आणि सनातन धर्माचे रक्षण करणार त्याला धर्मगुरुंचा आशिर्वाद मिळणार, असे जगतगुरु शंकराचार्य सदानंद महाराज यांनी म्हटले.
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याबाबतचा जी.आर.ची कॅापी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी धनुष्यबाण ही हातात घेतला, तसेच गाईंबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या वक्तव्याचं वाईट वाटून घेतलं नाही, तसेच त्यांच्या मंत्र्यांद्वारे त्यांची बाजू माझ्याकडे मांडली. तसेच, गाईंना राष्ट्रीय माता घोषित करावे, असे मी म्हटले होते.