सिंधुदुर्ग : आतापर्यंत सिंधुदुर्गात 1 हजार 62 मीमी पावसाची नोंद, 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या ४८ तासात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
गेल्या २ दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
यात कोकणात लाखो रुपयांचं नुकसान झालंय.
मालवण, वेंगुर्ला, राजापूरच्या ग्रामीण भागाला पावसाचा फटका बसला. वेंगुर्ला आणि मालवणात खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झालं.सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र काही ठिकाणी पावसाच्या अगदी हलक्या सरी पडत आहेत. सिंधुदुर्गात १ जूनपासून आतापर्यंत १ हजार ६२ मीमी पावसाची नोंद झालीय तर गेल्या २४ तासात २२ पूर्णांक ७५ मीलीमीटर पाऊस झालाय.