शांततेचा मुखवटा लावणाऱ्या Taliban चा खरा चेहरा, राष्ट्रीय ध्वज फडकवल्याने गोळीबार, अनेक मृत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशांततेच्या बाता मारणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा उघडा पडलाय. अफगाणिस्तानच्या असादाबाद शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त निघालेल्या रॅलीवर तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केलाय. या रॅलीमध्ये नागरिकांनी अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. त्यामुळे तालिबानचा संताप झाला. आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.