Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे UNCUT
Uddhav Thackeray, नागपूर : "गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?" असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोकं मेली तरी चालेल,पण यांना सत्ता हवी. परंपरेनं दसरा मेळावा घेणार, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार आहे. ईडी, सिबीआय यांनी बेजार करायची. बऱ्याच वर्षांनी इथे आलोय. मीडियाला काम करु द्या,त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. आपल्या दैवताच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद.