5 तास... 100 हत्या... 52 गंभीर जखमी; Ecuador च्या Guayaquil तुरुंगात रंक्तरंजित टोळीयुद्ध
5 तासांच्या कैद्यांच्या दोन गटातील हिंसक झटापटीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय... त्यातील अनेक कैद्यांचं शिर धडापासून वेगळं झालंय. ही घटना दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमधील गुआयाकिल तुरुंगात घडली... पोलीस आणि लष्कराला तुरुंगातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 5 तास लागले. तेवढा वेळ तिथे 5 रक्तपातच सुरु होता. त्यात 52 लोक गंभीर जखमी झालेत. यावेळी तुरुंगात गोळीबार, चाकू हल्ले आणि अगदी स्फोटही घडवल्याची माहिती मिळतेय. सध्या तुरुंग परिसराला लष्करानं वेढा घातला असून आता तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. विशेष म्हणजे याआधी 23 फेब्रुवारीला गुआयाकिलसह 4 तुरुंगांमध्ये झालेल्या दंगलींमध्ये 79 कैदी मारले गेले होते. त्यामुळे आता घडलेल्या घटनेनं गुआयाकिल तुरुंगासह इक्वाडोर देशातील सुरक्षा यंत्रणेवर सवाल उपस्थित होताहेत.























