Ukraine vs Russia : युध्द झाल्यास रशियाविरोधात America पुरवणार Ukraine देशाला लष्करी कुमक
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका अजून उडाला नसला तरी त्या वादातून आता ठिणग्या पडायला सुरुवात झालेय. युक्रेनवर हल्ला करण्यास रशियाच्या संसदेनं व्ल्वादिमिर पुतीन यांना परवानगी दिलीय.. रशियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता अमेरिकाही सरसावली आहे. अमेरिकेनं युक्रेनला रशियाविरोधात लष्करी कुमक पुरवण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा काल केली. रशियानं काल युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिल्यानंतर आता जगभरातून रशियाविरोधी भूमिका समोर यायला सुरुवात झालेय. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत..ब्रिटननं ५ रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत..तर युरोपीय संघही निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या























