Vasai Christmas : नाताळ सणासाठी वसईत रोषणाई, नाताळ गोठ्यांमध्ये आकर्षण देखावे : ABP Majha
वेगवेगळ्या उत्सवांमध्ये देखावे उभारून जसे संदेश दिले जातात, तसेच देखावे ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ सणानिमित्तानंही केले जातात. वसईमध्ये असेच अनेक नाताळगोठे बनवण्यात आलेत. नाताळगोठा म्हणजे प्रभू येशू जन्माचा देखावा. येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला. तो देखावा नाताळ गोठ्यात मांडला जातो. वसईच्या बंगली गावाजवळील वखारे वाडीत तरुणांनी एकत्र येऊन, सुंदर असा नाताळ गोठा बनवला आहे. नाताळ गोठा बनवण्याची पिढ्यान पिढ्या चाललेली ही परंपरा आता येथील तरुणांनीही सुरु ठेवली आहे. पापडी गावातल्या एका बंगल्यात येशूचं जन्मस्थान असलेलं बेथलेहेम शहर येशूच्या जन्माआधी कसं होतं याचा देखावा उभारला आहे. असे अनेक नाताळगोठे आणि नयनरम्य विद्युत रोषणाई सध्या वसई पश्चिमेकडील पट्ट्यात पाहायाला मिळते......




















