एक्स्प्लोर
Kalwa Mumbra Bridge Inauguration : मुंब्रा - कळवा पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय ?
राजकीय लढाईत ज्या पुलाचं उद्घाटन रखडलं होतं... अखेर त्या कळवा-मुंब्रा पुलाचं आज उद्घाटन पार पडलं... ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन उपनगरांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या पुलाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला...या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड एकत्र पाहायला मिळाले... उद्घाटनापूर्वी एकमेकांवर वार-पलटवार करणारे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मंचावर एकमेकांसोबत हसत खेळत चर्चा करताना दिसून आले... दरम्यान एबीपी माझाने या पुलाच्या उद्घाटनासाठी अनेकदा पाठपुरावा केला होता.. या पाठपुराव्याला आता यश आलंय..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















