Ujani Dam Water Storage : सोलापुरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Water Issue : यंदा उजनी धरणाची (Ujani Dam) अवस्था अतिशय बिकट बनली असून, पावसाने (Rain) फिरवलेली पाठ आणि ढिसाळ नियोजन यामुळे आत्ताच उजनी धरणाची पाणीपातळी अवघ्या 9 टक्क्यांवर पोहचली आहे. अशात आज घडीला कालव्यातून दुसरी पाळी देण्याचे ठरल्यास 22 जानेवारीपर्यंत उजनीची पाणीपातळी वजा होईल. सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह (Solapur Municipal Corporation), पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola) आणि मंगळवेढा (Mangalwedha) नगरपालिकेला पिण्यासाठी 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर शहरातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याची वेळ येणार आहे.