Rajendra Singh Solapur : उजनीचं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहांचा खळबळजनक दावा
डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ञ
मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पाणी जीवन आहे हे मी शिकलोय
राजस्थानमध्ये लोकांचा इलाज करताना त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुझे उपचार, औषध नको आम्हाला पाणी हवंय
स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतर पाण्याबाबतीत परिस्थिती सुधारली नाही उलट ही परिस्थिती प्रचंड बिघडली आहे
लोकप्रतिनिधिनी पाण्यासंदर्भात आवाज उठवणं, प्रश्न विचारण बंद केलंय
उजनी बाबतीत इथले लोकप्रतिनिधी किमान विधानसभेत प्रश्न तरी विचारायला हवं होतं
उजनीची स्थिती दिवसेंदिवस बिघडत जातेय, आधी इथे कॅन्सर रुग्ण असल्याचे आमच्या ऐकण्यात नव्हते
पण आता उजनीच्या शेजारी कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचे ऐकण्यात येतंय
भिगवणमध्ये आम्ही काल सभा घेतली तिथं लोकांनी सांगितलं प्रत्येक गावात कॅन्सरचे रुग्ण आहेत
उजनी धरण आता ICU मध्ये भरती आहे, इंडस्ट्रिअल भागातून जाणारे पाणी हेच त्याला कारण आहे
पाणी दूषित राहिल्याने उजनीतील जलचर मरतायत, उजनीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही
सिंधू पाणी वाटप करार
सिंधू कराराच्या बाबतीत जो निर्णय केंद्र सरकारने घेतला मी त्याचे स्वागत करतो, योग्य वेळी सरकारने हा निर्णय घेतला
कुठलाही करार 30 वर्षानंतर रिविव्ह केलं पाहिजे, 60 वर्ष झाले तरी अजून त्याबद्दल रिविव्ह झालेलं नाही
80 टक्के पाण्यावर भारताचा हक्क आहे, 7 नद्या हे पाणी पाकिस्तानमध्ये नेतायत
ह्या करारबाबतीत सुधारणा करून पाणी आपल्याकडे राखून ठेवलं पाहिजे























