Navy Day 2023 : तारकर्ली समुद्रात नौदलाच्या चित्त थरारक कसरती
नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात दाखल झालाय.. तारकर्ली समुद्रात नौदलाने सराव केला. या सरावावेळी आयएनएस विक्रमादित्य आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा यांसह अन्य युद्धनौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक दाखल होत सराव संचालनात सहभाग घेतला. तसंच तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्सनी चित्त थरारक कसरतीही केल्या. यावेळी एअर क्राफ्टच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता... दरम्यान उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पाहणी करणार आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी.......























