SERUM COVISHIELD | दिवाळीतली मोठी गूड न्यूज,सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात
मुंबई : दिवाळीतली सर्वात मोठी गूड न्यूज हाती आली आहे. सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरचं उपलब्ध होणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या कोविशील्ड लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईत कोविशील्ड लस दिलेल्यांपैकी कुणालाही साईड इफेक्ट दिसलेले नाहीत. मुंबईतल्या नायर आणि केईएम रूग्णालयात सुरू असलेल्या कोविशील्ड लसीची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस देवून एक महिना उलटल्यानंतरही एकाही व्यक्तीला कोणतेही साईड इफेक्ट किंवा शारीरिक त्रास झालेला नाही.
























