Sangli Jat Water Issue : पाणी न मिळाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा, जतमधील ग्रामस्थांचा इशारा
Sangli Jat Water Issue : पाणी न मिळाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा, जतमधील ग्रामस्थांचा इशारा
जत तालुक्यातील पूर्व भागातील आणि सीमावर्ती भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून या भागासाठी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या विस्तारीत म्हैसाळ योजनेच्या कामाला देखील अजून सुरुवात करण्यात आली नाही. यामुळे या जत पूर्व भागातील नागरिकानी शेवटचा पर्याय म्हणून कर्नाटकात जाण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा तसेच कानडी फलक लावण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिलाय. जत तालुक्यातील उमदी येथील पाणी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी प्रयत्न आणि आग्रही असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता जत तालुक्यातील जनतेने घेतलेली ही भूमिका आणि दिलेल्या इशाऱ्या बाबत काय भूमिका घेणार असाही सवाल या भागातील नागरिकांनी केलाय.