PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 29 एप्रिलला पुण्यात होणाऱ्या सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आधी ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार होती. मात्र आता ही सभा पुण्यातील रेस कोर्सच्या मैदानावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याच भाजपकडून सांगण्यात आलय. रेस कोर्सच्या मैदानाची क्षमता मोठी असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. 29 एप्रिलला संध्याकाळी पुणे जिल्ह्य़ातील महायुतीच्या चार उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे.























