![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या केलीय. अमर मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.. मूळचा सांगलीचा असणारा अमर पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. गेल्या 2 वर्षांपासून अमर पोलीस उपनिरीक्षकपदाची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एका गुणाने त्याची संधी हुकली. त्याच नैराश्यातून अमरने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिलीय. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आता अमर मोहिते या तरुणाने जीवन संपवलंय. विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये काहीसं निराशेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यश-अपयश जीवनाचा भाग आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना खचून जाऊ नका आणि टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन एबीपी माझा करतंय..
![Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/b599d92a1a08a7b53dc13f6396b0460a1719553108623719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/0c7f8fd6ef9ffaba2b0c1a239f5355c71719540421227719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/0bfb2ece4e27281b55e1f7f89cfd60731719426381613718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/028ec46b34e3d2194ece993dd78527221719400417334718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/881f0f8a7d8e0236366ad06dd14e80d51719391958527540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)