Kasaba Bypoll Election : कसबा पेठ मतदार संघात Hemant Rasane यांच्या प्रचाराचा नारळ फुटला
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज प्रचारांचा धडाका असणार आहे... विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात असून त्यांनी विविध बैठकांच आयोजन केल आहे... तर काँग्रेस आणि भाजपकडूनही प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराची आज सुरूवात होणार आहे... यावेळी काँग्रेसचे नेते उपस्थित रहाणार आहेत... भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कसबा गणपतीला आरती करून आजच्या दिवसाच्या प्रचाराची सुरुवात केलेय त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही आहेत... . रासनेंच्या प्रचारात सुधीर मुनगंटीवार सहभागी होणार आहेत. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत.
























