Fake Hair Transplant : बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश, 3 वर्षात 300 जणांना फसवलं
पुण्यात बोगस हेअर ट्रान्सप्लांटचं रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आरोपींनी ३ वर्षाच्या काळात तब्बल ३०० जणांची हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केलीय. बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. विमाननगर परिसरात हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अस्थेटिक स्टुडिओ नावाचं क्लिनिक थाटलं होेतं. हेअर ट्रान्सप्लांट करताना भूल देणे गरजेचे असतं, परंतु यातील एकाही आरोपीकडे भूल देण्याचं ज्ञान नव्हतं.. तरीसुद्धा आरोपींनी आतापर्यंत अनेकांना भूल देऊन ही शस्त्रक्रिया केली आहे.
Tags :
Hair Transplant