(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 01 PM : 01 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि आईची बाल निरिक्षण गृहात एक तास चौकशी, शिवानी अगरवाल यांना आज सकाळी पुणे गुन्हे शाखेकडून अटक
सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अगरवालला दणका, महाबळेश्वरमधील MPG क्लब हॉटेल सील
अपघात झाल्यावर स्थानिक आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक, सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य
घाटकोपरमधील होर्डिंगला पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारूनही कैसर खालिद यांनी दिली होती मंजुरी, खालिद यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल लवकरच एसआयटीकडे पाठवणार
घाटकोपर अपघात प्रकरणी कैसर खालिद सर्वात मोठा गुन्हेगार, पोलीस खातं त्याला का वाचवतंय, किरीट सोमय्यांचा स्वतःच्याच सरकारला सवाल
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन समोर.पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करुन सलमानला मारण्याचा होता कट, आतापर्यंत ४ जण अटकेत
मध्य रेल्वेवरील महामेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका, ठाणे स्थानकात एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल, स्थानकांमध्ये गर्दी
पुरोहितांची, मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या मिटकरींसोबत स्टेजवर बसणार नाही, बारामतीमधील सभेत भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं भुवया उंचावणारं