Vaishali Darekar Kalyan Loksabha : वैशाली दरेकरांच्या प्रचार रॅलीत गणपत गायकवाडांच्या पत्नी सहभागी
कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत एकाच जीपवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड बघायला मिळाल्या. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत भाजप आमदाराची पत्नी सहभागी झाल्याची चर्चा सुरु झाली.. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे.. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.. यानंतर गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर आरोप केले होते.. काही दिवसांपूर्वी गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदेंचा प्रचार करण्यात नकार दिला होता.. मात्र भाजप नेत्यांनी या वादावर तोडगा काढत पडदा टाकला