Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक पुण्यात ड्रग्ज प्रकरणावरील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन करत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्यात आंदोलन सरकराच्या अनागोंदी कारभाराचा आंदोलनातून निषेध सरकारविरोधात पुण्यात बॅनरबाजी सत्ताधार्याविरोधात घोषणाबाजी पुण्यात ड्रग्ज प्रकरणावरील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन करत आहेत
पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आलं असताना आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. आता, 'पिट्या भाई' अर्थात अभिनेता रमेश परदेशीची (Ramesh Pardeshi) पोस्ट आता चर्चेत आली आहे
'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करत पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता. आता, पुण्यात पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवनाच्या मुद्यावरून रमेश परदेशीची पोस्ट चर्चेत आली आहे. रमेश परदेशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, व्यसन,ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार तुम्ही? असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे.