एक्स्प्लोर
Thackeray brothers alliance | युतीची प्रक्रिया सुरू, निवडणूक जाहीर झाल्यावर निर्णय
मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडून टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मत मांडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि पक्ष युतीसंदर्भात सकारात्मक आहेत. मेळाव्यानंतरही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. यापुढेही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. युतीसंदर्भात निर्णय निवडणूक जाहीर झाल्यावर घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीबाबत भाष्य केले होते. मराठी मुद्द्यासाठी हा मेळावा होता, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनाही असेच मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठीच्या मुद्द्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, युती संदर्भातली चर्चा निवडणूक जाहीर झाल्यानंतर होईल. टप्प्याटप्प्यानं युती संदर्भात पक्ष चर्चा करेल आणि ही प्रक्रिया पुढे जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही जण ठाकरे बंधूंची युती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत आणि पुढेही हे प्रयत्न सुरू राहतील. राज ठाकरे यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल असे म्हटले आहे. 'मराठीच्या हिताचा रक्षण करण्यासाठी ही दोन्ही माणसे एकत्रित झाले पाहिजे,' असे मत व्यक्त करण्यात आले आहे. दोन्ही बाबांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























