Shinde Vs Shiv Sena : सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा, तर ठाकरेंना मोठा धक्का
शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.




















