Sharad Pawar Ajit Pawar : पवारांनी समोर बोट दाखवत प्रश्न विचारला, अजितदादांनीही हसत-हसत उत्तर दिलं
Sharad Pawar Ajit Pawar : पवारांनी समोर बोट दाखवत प्रश्न विचारला, अजितदादांनीही हसत-हसत उत्तर दिलं
काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवारांची भेट झालीय.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय संदर्भातील बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र आले..बैठकीमध्ये दोघेही शेजारी बसले होते.. शिवाजीनगर येथील साखर संकुलात ही बैठक झाली..पवार काका-पुतण्याव्यतिरिक्त या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते..
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर...३१ ऑक्टोबर २०२६पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार...एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...
पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा... वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये चर्चा ...
संभाजीनगरातील संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोघांना अटक...आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक...वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली आठ लाखांची रक्कमही हस्तगत..
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी NIA कडून ८ राज्यात १५ ठिकाणी छापेमारी...PIOशी संबंधित संशयितांवर छापे...महाराष्ट्र,पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश...
पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा...पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये ८० टक्के चिनी उपकरणं...सिंगापुरातील शांग्री-ला संवादात सीडीएस अनिल चौहानांची माहिती...



















