एक्स्प्लोर
Samana on Ajit Pawar | सामनातून भाजपवर टीकास्त्र, टोणगा म्हणत अजित पवारांवर निशाणा | ABP Majha
अजित पवार यांचं बंड फसल्याचं सांगत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार तोंडसुख घेण्यात आलंय. लाडू पचतील काय... बंड फसले अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून शिवसेनेनं भाजप आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. भाजपनं बहुमत सिद्ध करणं म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखं अशा शब्दांत भाजपवर सामनामधून निशाणा साधण्यात आलाय. टोणगा म्हणत अजित पवारांनाही लक्ष्य करण्यात आलंय. अजित पवारांना तुरुंगात पाठवू म्हणणारे त्यांच्या नावाने घोषणा देत होते मात्र कुठेही जल्लोष नव्हता असंही या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. मुंडके गाढवाचे आणि धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारण्यात आल्याची खरमरीत टीकाही अग्रलेखातून करण्यात आलीय. सत्तेसाठी भाजपनं राजभवनाचा गैरवापर केल्याचा आरोप करत भाजपला लक्ष्य करण्यात आलंय.
राजकारण
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा





















