Rohini Khadse On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या- रोहिणी खडसे
Rohini Khadse On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या- रोहिणी खडसे
पूर्ण वेळ महिला आयोगाला काम करणार अध्यक्ष मिळावा हे उशिरा सुचलेले शहाणपण
त्यामुळे मी बैठकीला जाणार नाही, बैठकीचा फाल्तुपणा का लावला
अध्यक्षांचा राजीनामा घ्यायची वेळ आली आहे
चाकणकरांचा राजीनामा घ्यावा
माझा आरोप आहेत की त्यांनी ३५ केस दाखवाव्यात ज्या महिलांना न्याय मिळाला
फक्त ई मेल केला की कारवाई पूर्ण होते , पण हे एवढंच काम आहे का
प्रिया फुके केस मध्ये एक वर्ष झालं अजूनही न्याय नाही
आज महिला आयोग स्वयंकेंद्रित काम करत आहे
आशासकीय संघटना जोडल्या का नाही गेल्या , त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी शिबिर का आयोजित केली नाहीत
खेड्यापाड्यातल्या महिलांचे प्रबोधन करणे गरजेचे , यासाठी विशेष निधी असतो
जेवढे सदस्य , कर्मचारी हवे असतात तेवढेही नाहीत
------------------------
आजची विधानभवन मधील बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे. आधी बैठका घेतल्या असत्या तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता
आज महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आम्ही मागतोय म्हणून यांना आता बैठका घेण्याच सुचलं आहे. बैठका घेण्याचा दिखावा बंद करा. सध्याच्या आयोगाच्या व्यक्तीकेंद्रित आहेत म्हणून ७ सदस्य यांनी भरले नाहीत.
त्या म्हणतात हुंडा बळीच्या झिरो पेंडण्सी आहे. या मॉडर्न महिलाध्यक्षा आहेत. केवळ आलेल्या मेलला पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करण हे त्यांचं काम आहे का? पोस्टाने ज्या तक्रारी येतात त्याची दखल ह्या घेत नाहीत का? प्रिया फुके यांनी एक वर्षापूर्वी पोस्टाने तक्रार केली या म्हणतात प्रिया फुकेची तक्रार आमच्याकडे आली नाही. खेडोपाड्यात राहणाऱ्या महिला मेल वर कशा तक्रारी करणार?
आयोगाच्या अध्यक्षांनी दिखावा करून काम केलं असतं वेगळं चित्र पाहिला मिळाल असतं. पाच ते सहा महिने या आयोगाच्या बैठका देखील घेत नाहीत. त्यांना एकावेळी दोन जबाबदाऱ्या झेपत नाहीत त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा कारण त्यांचा सगळा वेळ पक्षाचे काम करण्यात जातो























