Narendra Modi Cabinet : एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली? शिवसेनेला केवळ राज्यमंत्रिपद
Narendra Modi Cabinet : एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली? शिवसेनेला केवळ राज्यमंत्रिपद
मोठी बातमी! 'गुगल पे' बंद, गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय
मुंबई : सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. कधीकाळी बँकेशी संबंधित एखादे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा. आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदांत पूर्ण करू शकता. यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठे निर्णय घेतला आहे. सध्या गुगल पे हे अॅप एका देशात बंद करण्यात आले आहे.
अमेरिकेत गुगल पे अॅप बंद
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे हे अॅप गुगले बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला? याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे अॅप ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते. भारताने वापराच्या बाबतीत हे अॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना अमेरिकेत हे अॅप बंद करण्यामागचं कारण काय? असं विचारलं जातंय.
गुगल पे बंद करण्यामागचं 'हे' आहे कारण
गुगलने अमेरिकेत गुगल पे हे अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जातंय. तसेच ऑनलाईन पेमेंट आणखी सोपे व्हावे यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.