MLA Disqualification : नार्वेकरांना दुसरा झटका, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय द्या, कोर्टाचे आदेश
MLA Disqualification : नार्वेकरांना दुसरा झटका, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय द्या, कोर्टाचे आदेश
MLA Disqualification Case: नवी दिल्ली : आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी (MLA Disqualification Case) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. आजही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांचं वेळापत्रक फेटाळलं आहे. तसेच, अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत.
31 डिसेंबरपर्यंतची मुदत देत एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली डेडलाईन पाळली नाहीतर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोणतीही घडामोड गेल्या सहा महिन्यांत घडलेली नाही. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत असल्याचा आरोप सातत्यानं ठाकरे गटाकडून होत आहे.
![Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1400f26fa325cac0ea814370e49a80761739816413410977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f34b844b629cb39f5e6dbf4308fa68fa1739780014786718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)