Candidate For Rajya sabha:राष्ट्रवादीकडूनPrafful Patel राज्यसभेवर,तांत्रिक बाबींचा विचार करत निर्णय
Candidate For Rajya sabha : राष्ट्रवादीकडून Prafful Patel राज्यसभेवर जाणार , तांत्रिक बाबींचा विचार करत निर्णय
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आजच महायुती आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे.























