Akhilesh Yadav : अखिलेश यादव अखेर काकांसोबत जाणार ABP Majha

Continues below advertisement

अखेर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि प्रगतिशील समाजवादी पार्टीमध्ये युती झालीय. सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांच्याबरोबर जुळवून घेण्याचं मान्य केल्यामुळं ही युती झाली. दस्तुरखुद्द अखिलेश यादव यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली. प्रसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर भेट झाली आणि त्यात युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्थानिक पक्षांना सोबत घेऊन सपा दिवसेंदिवस मजबूत होऊ लागलीय आणि या सहकाऱ्यांसह एका ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करु लागलोय असंही अखिलेश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. समाजवादी पार्टीनं आतापर्यंत जयंत चौधरी यांचा आरएलडी, ओमप्रकाश राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, केशव देव मौर्य यांचा महान दल, संजय चौहान यांची जनवादी पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपना दल कमेरावादी या छोट्या पक्षांशी आघाडी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram