ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 25 Sept 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची अडीच तास बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती
ताकदीेने मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही, विजय आपलाच आहे, अमित शाहांच्या बैठकीत फडणवीसांना फुंकलं रणशिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद.
रात्री उशीरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी घेतले उपचार.
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव...पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप..याचिकेवर
आज तातडीची सुनावणी
बदलापूर एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, पोलीस सरकारसाठी वसुली करणारे तर पोलीस जनतेसाठी हिशोब करणार फरक स्पष्ट अशा आशयाचा बॅनर, मविआला डिवचण्याचा प्रयत्न