Parbhani :परभणीत बालविवाहाच्या 5 घटना रोखल्या, चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास पथकाची कारवाई
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 08:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीत ५ बालविवाहाच्या घटना रोखण्यात यश आलंय... परभणीच्या सोनपेठ आणि जिंतुर तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींचा विवाह केला जात होता... याची माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर मिळाली आणि त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अभियानाअंतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास पथकाने थेट गावात जाऊन हे बालविवाह रोखले.... पुढील काळजी आणि संरक्षणासाठी बालविवाहातील मुलं आणि मुलींना बालकल्याण समितीपुढे पालकांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत... दरम्यान, सक्षम कायदे आणि सातत्याने लोकप्रबोधन करूनही बालविवाह केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत...ही खूप गंभीर बाब आहे...