Pak Attack Firojpur : फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचा नागरिकांवर हल्ला, जखमींना रुग्णालयात हलवलं
Pak Attack Firojpur : फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचा नागरिकांवर हल्ला, जखमींना रुग्णालयात हलवलं
या आधी तोंडावर आपटूनसुद्धा पाकिस्तान सुधारला नसल्याचं दिसून येतंय. गुरुवारी केलेले सर्व ड्रोन हल्ले अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्रीही तोच कित्ता गिरवल्याचं दिसतंय. अमृतसर आणि जैसेलमेर या शहरांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. या दोन्ही ठिकाणचे हल्ले भारताने परतवून लावल्याची माहिती आहे.
अमृतसरमध्ये जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर असून त्याला पाकिस्तान लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. जैसलमेरमध्येही पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानचे चार ड्रोन भारतानं पाडले. दरम्यान, राजस्थानच्या बाडनेरमध्येही संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.
नागरी विमानांच्या आड पाकिस्तानचा हल्ला
गुरुवारपासून पाकिस्तानची आगळीक सुरूच असून पाकिस्तानकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये गोळीबार सुरू केला आहे. त्याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं. गुरुवारी रात्री भारताच्या जवळपास 36 ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हे हल्ले निष्प्रभही केले. पण भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानने, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचे पुरावे भारताने समोर आणले.





















